महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
मानकापूर उड्डाणपूल अखेर जनतेसाठी खुला:वाहतूक कोंडीला दिलासा

नागपूर : – कित्येक दिवसांपासून रखडलेला मानकापूर उड्डाणपूल अखेर आज जनतेसाठी खुला करण्यात आला. या पुलाचे काम अपूर्ण असल्याने तो बंद होता. परिणामी, परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत होती आणि अपघातांची मालिकाही सुरू झाली होती.
वाहतूक कोंडी व अयोग्य रस्त्यांमुळे काही दिवसांपूर्वीच एका शाळकरी विद्यार्थ्याचा आणि एका वाहनचालकाचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनांमुळे नागरिकांचा संताप वाढला. सातत्याने होत असलेल्या मागण्या आणि जनप्रतिनिधींच्या हस्तक्षेपानंतर प्रशासनाने अखेर हा उड्डाणपूल अधिकृतरीत्या सुरू करण्याचा निर्णय घेतला.
पुल सुरू झाल्याने मानकापूर परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी ही पायरी महत्वाची ठरणार आहे.

