नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश

नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या असंघटित विभाग आणि अल्पसंख्याक विभागाचा कार्यकारणी जाहीर कार्यक्रम, मेळावा नुकताच नागपूर येथे उत्साहात पार पडला. या मेळाव्याला पक्षाचे निरीक्षक राजेंद्र जैन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे, या मेळाव्यादरम्यान इतर अनेक पक्षांतील कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तसेच काही नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली.
याच दिवशी उत्तर नागपूर येथील श्री. दिनेश रोडगे यांच्या आयोजनाखाली नवनियुक्त शहराध्यक्ष अनिल अहीरकर आणि निरीक्षक राजेंद्र जैन यांचा भव्य सत्कार समारंभ व मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये बोलताना निरीक्षक राजेंद्र जैन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या ध्येयधोरणांवर प्रकाश टाकला. त्यांनी असंघटित कामगार आणि अल्पसंख्याक समाजाच्या प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. तसेच, इतर पक्षांतून आलेल्या कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले.
नवनियुक्त शहराध्यक्ष अनिल अहीरकर यांनी त्यांच्या भाषणात, सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची आणि पक्षाला नागपूर शहरात अधिक मजबूत करण्याची ग्वाही दिली. त्यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्व नवीन सदस्यांचे स्वागत केले आणि त्यांच्या सहकार्याने पक्ष अधिक उंचीवर जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
या मेळाव्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन ऊर्जा निर्माण झाली असून, नागपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढल्याचे दिसून येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. मेळाव्याच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.
या प्रसंगी सुनीता येरणे, लालाभाई चौबे, विशाल खांडेकर, प्रशांत पवार, तानाजी वनवे, हाजी सोहेल पटेल, बजरंग सिंग परिहार, दिलीप पणकुले, जानबा मस्के, मुनाफ बंदुकिया, मेहबूब पठाण, मुमताज बाजी, कल्ला नायक, राकेश घोसीकर, विवेक वानखेडे, एकनाथ फलके, सोनू पंडित, मोसिन शेख, विशाल गोंडाणे, संदेश खोब्रागडे, विशाल शेलारे, रोहन नागपुरे, राज साखरे, जाफर कुरेशी,आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


