महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपुर मनपाकडून ‘मिशन रेबीज’ला सुरुवात; २० हजार कुत्र्यांना दिले जाणार लस

नागपूर : शहरात रेबीज निर्मूलनासाठी नागपूर महानगरपालिकेकडून आजपासून ‘मिशन रेबीज’ अंतर्गत विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे २८ सप्टेंबर २०२५ पर्यंत सुमारे २० हजार कुत्र्यांना एंटीरेबीज लस देण्यात येणार आहे.
या उपक्रमासाठी २० पशुप्रेमी फीडर्सनी आपापल्या पाळीव व सांभाळात असलेल्या कुत्र्यांचे नोंदणी करून सहभाग नोंदविला आहे. मनपा आरोग्य विभाग व पशुवैद्यकीय टीम यांच्या संयुक्त विद्यमाने मोहिमेचे नियोजन करण्यात आले आहे.
अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या पाळीव कुत्र्यांचे वेळेवर लसीकरण करून नागपूर शहराला रेबीजमुक्त बनविण्यास सहकार्य करावे.
इच्छुक नागरिकांनी पाळीव प्राण्यांच्या नोंदणीसाठी हा फॉर्म भरावा: 👉 forms.gle/jpbUtEyZsacrxye9A



