ऑपरेशन शक्ती अंतर्गत देहव्यवसायाचा भांडाफोड ,१ महिलेची सुटका, आरोपी महिला अटकेत

नागपूर :- शहर पोलिस आयुक्त यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या “ऑपरेशन शक्ती अंतर्गत” मोहिमेत गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाने मानवी तस्करी आणि देहव्यवसायाविरोधात मोठी कारवाई केली.
मिळालेल्या खबरीवरून पोलिसांनी एमआयडीसी हद्दीत, राजगुरुनगर शोगावर ले-आऊट, लोकमान्य मेट्रो स्टेशनजवळ राहणाऱ्या आरोपी ममता विकास पांडे (वय ३२ वर्षे) हिच्या घरावर धाड टाकली. आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पीडित मुलीला देहव्यवसाय करण्यास प्रवृत्त करत असल्याचे समोर आले. कारवाईदरम्यान १ पीडित महिलेची सुटका करण्यात आली.
आरोपीकडून रोख रक्कम रु. २,०००/-, मोबाईल फोन व इतर साहित्य असा एकूण रु. १२,०१०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणात आरोपीवर कलम ३७०(३) भा.दं.सं. तसेच सहकलम ३, ४, ५ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.



