ऑपरेशन थंडर अंतर्गत नागपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी : 34 लाखांचा मेफेड्रोन सोबत 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : शहरातील गुन्हे शाखेने केलेल्या धडाकेबाज कारवाईत मेफेड्रोन या मादक पदार्थाचा मोठा साठा हस्तगत करण्यात आला आहे.एकूण 225 ग्रॅम तब्बल 34 लाख रुपयांचा मेफेड्रोन जप्त करून चार आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.
मा. पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन थंडर अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर पहाटे ३.१५ वाजता मिलीमाता नगर परिसरात संशयित वाहन तपासणी करण्यात आल. त्यावेळी आरोपींच्या ताब्यातून 5 ग्रॅम मेफेड्रोन हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला. व दोन आरोपीना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपीन कढून मेफेड्रोन कुठून आणलं कुणाला देणार अशी कसून चौकशी केली असता पुन्हा दोन आरोपीचा सुगावा लागला त्यांना देखील पोलिसांनी 220 ग्रम मेफेड्रोन सोबत अटक केली आहे ज्याची किंमत 34 लाख रुपये व चार चाकी वाहन मोबाईल फोन असा एकूण 50 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे
तपासादरम्यान आरोपींकडून इलेक्ट्रॉनिक पुरावे, मोबाईल फोन, ई-व्हॉलेट व्यवहार आणि इतर संशयास्पद कागदपत्रे पोलिसांच्या हाती लागली आहेत. या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर मादक पदार्थ विक्री व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
एकूण 4 आरोपी अटक: आरोपीची संख्या वाढण्याची शक्यता



