ऑपरेशन थंडर अंतर्गत सुगंधी तंबाखू, सुपारीवर कारवाई : राहत्या घरातून 90 हजारांचा मुद्देमाल जप्त

नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑपरेशन थंडर अंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक (PSI) रवींद्र चव्हाण व त्यांच्या तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार चांदमारी नगर, शीतला माता मंदिराजवळ राहणाऱ्या गणेश रामकृष्ण गडीवर (वय 38) यांच्या घरी छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधी तंबाखू, सडकी सुपारी आणि खर्रा घोटण्याची उपकरणे असा एकूण 90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
जप्त केलेला मुद्देमाल असा आहे –
जनम तंबाखूची 12 पाकिटे (प्रत्येकी 500 ग्रॅम, किंमत 3,000 रुपये)
सुपारीच्या 5 बोऱ्या सीलबंद व अर्धी बोरी (एकूण किंमत 66,000 रुपये)
खर्रा घोटण्याची 3 विद्युत उपकरणे (प्रत्येकी 7,000 रुपये, एकूण किंमत 21,000 रुपये)
ही जप्ती पंचासमक्ष करण्यात आली असून पंचनामा e-Sakshya App वर नोंदविण्यात आला आहे. आरोपीसह सर्व मुद्देमाल वाठोडा पोलीस ठाण्यात आणून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.




