Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
ऑटोमोटिव्ह चौकात एटीएम फोडण्याचा प्रयत्न फसला,नागरिकांच्या सजगतेने आरोपी कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : शहरातील ऑटोमोटिव्ह चौक परिसरात एका आरोपीने एटीएम मशीन फोडून पैसे लंपास करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सजग नागरिकांच्या तत्परतेमुळे त्याचा डाव हाणून पाडण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, चेतन चंदुजी उईके (रा. समुद्रपूर, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. संशयास्पद हालचाली पाहून नागरिकांनी तात्काळ धाडस दाखवत आरोपीला पकडले व कपिलनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. नागरिकांच्या जागरूकतेमुळे मोठी चोरी टळली असून पोलिसांनी त्यांचे कौतुक केले आहे.



