पतीच्या डोक्यावर फोडली दारूची बाटली ,कौटुंबिक वादातून हल्ला : पत्नी अटक

नागपूर : कौटंबिक वाद विकोपाला गेल्यानंतर संतापलेल्या पत्नीने पतीच्या डोक्यावर दारूची बाटली फोडून रक्तबंबाळ केले ही थरार घटना सोमवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास अंबाझरी ठाण्यांतर्गत पांढराबोडीच्या जयनगर परिसरात
घडली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. . या प्रकरणी पोलिसांनी आरती शाहू (२४) रा. पांढराबोडी याच्या तक्रारीवरून
आरोपी पत्नी प्रज्ञा शगारे (२८) विरूध्द गुन्हा दाखल केला आहे जखमी पती रोशन शगारे (३२) याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे
रोशन आषि प्रज्ञा यांच्या विवाहाला साडेतीन वर्ष झाली. त्यांना मुलबाळ नाही रोशन हा खाजगी काम करतो. त्यांच्यात अधुन मधून खटके उडायचे. सोमवारी ‘दुपारी रोशन घरी होता. कौटुंबिक कारणावरून त्यांच्यात वाद झाला, वाद विकोपाला जाताच प्रज्ञाने घरी ठेवलेली दारूची बाटली रोशनच्या डोक्यावर आदळली. रोशन रक्तबंबाळ होऊन खाली कोसळला पाहता, पाहता परिसरातील लोकांची गर्दीं वादत गेली. माहिती मिळताच अंबाझरी पोलिस घटनास्थळ पोहोचले, जखमी रोशनला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रोशनची नातेवाईक आरती शाहूच्या तक्रारीवरून पोलिसांनी प्रज्ञा विरुद्ध गुन्हा नोंदवून तिला अटक केली.



