संविधान चौकात भीषण अपघात,कंटेनरने महिलेला चिरडले

नागपूर : – भरधाव जाणाऱ्या कंटेनरच्या चालकाने दुचाकीला धडक दिली या भीषण अपघातात महिला चिरडल्या गेली. तिचा संविधान चौकात घटनास्थळीच मृत्यू झाला, वनीता भुते (4७) रा. पाटणसावंगी असे मृत महिलेचे नाव आहे
अपघाताची ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास संविधान चौकात घडली या प्रकरणी सीताबर्डीं पोलिसांनी गुहा नोंदवून आरोपी कंटेनर चालकाला अटक केलो आहे.नरेंद्रसिंग रघुवीरसिंगं (३७) रा. राजस्थान असे अटकेतील कंटनेर चालकाचे नाव आहे. भोजराज भूते हे पत्नीसह नागपुरात कामानिमित्त आले होते. काम आटोपल्यावर ते पाटणसावंगीला जात होते. संविधान चौकातील सिग्नलवर थांबले असताना मागून आलेल्या कंटेनरचा चालक आहे.नरेंद्रसिंग रघुवीरसिंगं भरधाव आणि निष्काळजीपणे वाहन चालवित दुचाकीला जबर धडक दिली, यात वनीता खाली पडून कंटनेरच्चा चाकाखाली आल्या आणि घटनास्थळीच त्यांचा मृत्यूझाला. माहिती मिळताच सीताबर्डी ठाण्याचे वरिषठ पोलिस निरीक्षक विठ्ठुरसिंग राजपूत पथकासह घटनास्थळी पोहोचले.
तत्पूर्वी रस्याने जाणा्यंची गर्दी झाली. त्यामुळे आरोपीला पळता आले नाही. पोलिसांनी रक्तबंबाळ महिलेला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले., पोलिसांनी आरोपी चालक आहे.नरेंद्रसिंग रघुवीरसिंगं विरुद्ध गुन्हा नांदवून त्याला अटक केली. कंटनरही ताब्यात घेतला आहे


