समता नगरातील फुटवेअर दुकानात भीषण आग, संपूर्ण सामान जळून खाक

नागपुर – समता नगर रोड, नाल्याजवळ असलेल्या डी.के. स्टाईलिश फुटवेअरच्या दुकानाला आज (ता. 23 सप्टेंबर) भीषण आग लागली. आगीमुळे दुकानातील चप्पल, सॅन्डल, जोडे, स्कूल व कॉलेज बॅग, फर्निचर, पंखे, सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि इतर साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले.
घटनास्थळावर माहिती मिळताच सुगतनगर अग्निशमन केंद्रातील जवान तात्काळ पोहोचले आणि शर्तीचे प्रयत्न करून आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या आगीत कोणतीही व्यक्ती जखमी झाली नाही.
आगीची कारणे अद्याप निश्चित झालेले नाहीत, मात्र प्राथमिक माहितीवरून शॉर्ट सर्किट किंवा विजेच्या वायरिंगमुळे ही आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस आणि अग्निशमन दल या घटनेची सविस्तर चौकशी करत आहेत.
स्थानिक व्यापारी व नागरिकांनी आग नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य केले असून, दुकान मालकाला मोठ्या आर्थिक नुकसानाची उणीव भासली आहे.



