महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
दारू भट्टी मालकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून दारू भट्टीत चोरी, ५० हजार , मोबाईल आणि दारूच्या बाटल्या घेऊन पसार

नागपूर – पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंचशील चौक परिसरात धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका दारूच्या भट्टीत घुसून चोरट्याने भट्टी मालकाच्या डोळ्यांत मिरची पूड टाकली आणि जबरदस्तीने चोरी केली. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चोरट्याने भट्टीतील ५० हजार रुपये रोकड, मोबाईल फोन आणि दारूच्या बाटल्या घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पाचपावली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रं फिरवली आणि तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला अल्पावधीतच गजाआड केले.
पोलिसांच्या या झटपट आणि प्रभावी कारवाईचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे. या घटनेमुळे दारू विक्रेत्यांमध्येही भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली आहे.


