कपडे धुण्याच्या गोट्यावरून वाद; सख्या भावाकडून मोठ्या भावावर जीवघेणा हल्ला
भांडेवाडीतील दुर्गानगरात सख्या भावाकडून भावावर जीवघेणा हल्ला – प्रॉपर्टीच्या वादातून हाणामारी
नागपूर – कपडे धुण्याच्या गोट्यावरून वाद उफाळून सख्या भावाकडून मोठ्या भावावर लाकडी दांड्याने जीवघेणा हल्ला करण्यात आला. ही घटना ५ जुलै रोजी भांडेवाडी परिसरातील दुर्गानगर येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार, किशोर शेडके आणि राकेश शेडके हे दोन सख्या भाऊ असून, त्यांच्यात गेल्या अनेक दिवसांपासून प्रॉपर्टीच्या वाटणीवरून वाद सुरू होता. मात्र ५ तारखेला कपडे धुण्याचा गोटा कुणाचा यावरून पुन्हा वाद उफाळला.
वाद इतका टोकाला गेला की लहान भाऊ राकेश शेडके याने आपल्या मोठ्या भावावर – किशोर शेडके – याच्यावर लाकडी दांड्याने जबर मारहाण केली. या हल्ल्यात किशोर गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर शेडके आणि राकेश शेडके हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये गेले काही दिवस प्रॉपर्टीच्या मालकीवरून सतत वाद सुरु होते. त्या वादात कपडे धुण्याच्या गोट्याच्या मालकीवरून वाद झाला आणि रागाच्या भरात राकेशने मोठा भाऊ किशोर याच्यावर लाकडी दांड्याने हल्ला चढवला.
विशेष म्हणजे, हल्ल्याच्या वेळी राकेशने आपल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलालाही सोबत घेतले होते. हल्ल्यामुळे किशोर शेडके गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी घटनास्थळी तातडीने पोहचून हस्तक्षेप केला आणि त्याचा जीव वाचवला.
या प्रकरणात पोलिसांनी राकेश शेडके व त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे. स्थानिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे


