महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

वर्धा रोडवरील बनवाडी- अशोकवन रस्त्यावर बिबट्याचा वावर; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

नागपूर: वर्धा रोडला लागून असलेल्या बनवाडी ते अशोकवन या मार्गावर, सहारा सिटीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा पहावयास मिळाला आहे. प्रत्यक्षदर्शींनी या बिबट्याला रोडवर चालताना पाहिल्याचे सांगितले असून, यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

सदर रस्त्यावर दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. Monthfort School मधील लहान विद्यार्थी, नर्सिंगपासून ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी तसेच Pallotti Engineering College चे विद्यार्थी याच मार्गावरून प्रवास करतात. याशिवाय परिसरातील शेतकरी, मजूर आणि ले-आउटवर काम करणारे कामगार यांचा देखील या मार्गावरून नियमितपणे ये-जा असते.

 

दरवर्षी पावसाळा आणि हिवाळ्याच्या काळात या परिसरात बिबट्या वाघाचे दर्शन होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. मात्र, याबाबत वनविभागाकडे वारंवार तक्रार करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही, ही बाब अत्यंत गंभीर आहे.

 

परिसरात बिबट्याचा वावर ही संभाव्य जीवितहानीस कारणीभूत ठरू शकते. नागरिक आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वनविभागाने तातडीने योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी जोर धरत आहे. विशेषतः शाळा-कॉलेजच्या वेळात पेट्रोलिंग वाढवणे, सीसीटीव्ही लावणे, सूचना फलक लावणे आणि आवश्यक असल्यास पिंजरा लावून बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न करावेत अशी स्थानिकांची विनंती आहे.

 

सतत दुर्लक्ष केल्यास भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडू शकते, आणि त्याची जबाबदारी वनविभागावर राहील, असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button