युनियन बँकेचा मराठी FIR नकार; मनसेचं आक्रमक आंदोलन, कार्यकर्त्यांना अटक

नागपूर – युनियन बँकच्या नागपूर शाखेने मराठीत दाखल करण्यात आलेली FIR स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे एक सामान्य बोपचे कुटुंब अडचणीत सापडले आहे. या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली.
मनसे नागपूर शहराध्यक्ष मा. चंदुभाऊ लाडे यांच्या नेतृत्वात युनियन बँकेला जाब विचारण्यासाठी आंदोलन छेडण्यात आले. बँकेच्या समोर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि मराठी भाषेचा अवमान करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली.
यावेळी परिस्थिती तणावपूर्ण झाल्याने पोलिसांनी आंदोलनात सहभागी झालेल्या मनसे कार्यकर्त्यांना अटक केली. दरम्यान, मनसेने स्पष्ट केलं की हा लढा मराठीचा असून, अशा प्रकारचा अन्याय खपवून घेतला जाणार नाही.
घटनेमुळे नागपूरमध्ये मराठीप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, संबंधित बँक आणि पोलिस प्रशासनावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहेत.