महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
6 तारखेला होणार लावारस गाड्यांची निलामी:बजाजनगर पोलिस स्टेशनची अधिकृत घोषणा
नागपूर : – बजाजनगर पोलिस ठाण्याच्या ताब्यात असलेल्या १० लावारस वाहनांची निलामी येत्या ६ ऑगस्ट रोजी होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजय मानकर यांनी दिली आहे. ही निलामी पोलिस ठाण्याच्या आवारात पार पडणार आहे.
ज्या नागरिकांना निलामी प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे, त्यांना ५ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत नाव नोंदणी करणे आवश्यक आहे. बोलीत सहभागी होण्यासाठी किमान ₹१०,००० ठेव रक्कम भरावी लागेल.
वाहनांची यादी, इंजिन आणि चेसिस क्रमांक पोलिस ठाण्याच्या सूचना फलकावर लावण्यात आले आहेत. ठरलेल्या वेळेत नाव नोंदणी केलेल्यांनाच बोलीत भाग घेता येईल. उशिरा प्राप्त होणाऱ्या अर्जांची कोणतीही नोंद घेतली जाणार नाही, असेही मानकर यांनी स्पष्ट केले.
इच्छुक खरेदीदारांना बजाजनगर पोलिस ठाण्यात येऊन वाहनांचे प्रत्यक्ष निरीक्षण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



