महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नितीन गडकरी यांच्या घराला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा व्यवस्था वाढवली

नागपूर : – वर्धा रोडवर स्थित केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. ही माहिती कंट्रोल रूममध्ये आलेल्या एका कॉलद्वारे प्रतापनगर पोलीस ठाण्याला मिळाली. घटनेची गंभीर दखल घेत गडकरी यांच्या घराची सुरक्षा तत्काळ वाढवण्यात आली आहे. पोलिसांनी कॉलचा शोध घेण्याचे काम सुरू केले असून, या धमकीमागे कोण आहे हे शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संपूर्ण परिसरात सावधगिरीचा उपाय म्हणून अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले असून, वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित आहेत.