महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
सुरक्षा बलातील जवानाची फ्लायओव्हरवरून उडी घेऊन आत्महत्या, परिसरात खळबळ

नागपूर | मानकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या फ्लायओव्हरवर एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये यशवंत रमेश शाहू (वय 31) या सुरक्षा बलातील जवानाने उडी घेऊन आत्महत्या केली. तो कुकरेजा नगर, जरीपटका परिसरात राहत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, यशवंत हे मॅनस्को सुरक्षा दलात कार्यरत होते. शनिवारी अचानक त्यांनी फ्लायओव्हरवरून उडी घेतल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच मानकापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस अधिक तपास करत आहेत.