नागपुरात टॉप मोस्ट हिस्ट्रीशीटर समीर उर्फ येडा शमशेरची निर्घृण हत्या; वर्चस्वासाठी रक्तरंजित संघर्ष?

नागपूर : – यशोधरा नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राजीव गांधी नगर पुलाखाली गुरुवारी पहाटे एक खळबळजनक घटना घडली. परिसरातील कुख्यात गुन्हेगार आणि टॉप मोस्ट हिस्ट्रीशीटर समीर शेख उर्फ येडा शमशेर खान याची कोयते आणि बेसबॉलच्या बॅटने निर्घृण हत्या करण्यात आली.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार ही घटना वर्चस्वाच्या संघर्षातून घडली असल्याची शक्यता आहे. मृत समीर शेखवर ३१ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. यात खूनाचा प्रयत्न, एमपीडीए, मारहाण, आणि अंमली पदार्थांची तस्करी यांचा समावेश होता. विशेषतः गांजाची तस्करी हा त्याचा प्रमुख गुन्हेगारी क्षेत्र होता.
ही हत्या परिसरातील दुसऱ्या गुन्हेगारी गटाशी असलेल्या शत्रुत्वातून झाल्याची माहिती समोर येत आहे. अशु नावाच्या गुन्हेगाराने आपल्या साथीदारांसह योजना आखून ही हत्या केल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे ही घटना अशुच्या घराजवळच घडली असून तो सध्या फरार आहे
हत्या झाल्याच्या वेळी समीर शेख मोमिनपुरा येथील आपल्या सासरहून घरी परतत होता. घटनेनंतर यशोधरा नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला असून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिस तपास सुरु आहे आणि आरोपींचा शोध घेतला जात आहे.