महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाची एंट्री; नागपूरसह विदर्भाला दिलासा मिळण्याची शक्यता

नागपूर | विदर्भातील अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून प्रखर उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तापमानाने चाळीशीत मजल मारल्याने शहरी आणि ग्रामीण भागात उन्हाच्या झळा चटके देत आहेत. या उष्णतेपासून थोडा तरी दिलासा मिळणार असल्याची चिन्हं आता दिसू लागली आहेत.
विदर्भात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा पावसाचे आगमन होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. नागपूरसह भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याचा इशारा देण्यात आला आहे. सध्या आकाशात ढग दाटले असून हवामानात बदल जाणवू लागले आहेत.
दुसरीकडे, पावसाने विश्रांती घेतलेले अकोला, अमरावती, बुलढाणा, गडचिरोली आणि वाशिम भाग मात्र अजूनही कोरडेच आहेत.