महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
AMRAVATI | भाजप नेत्या माजी खासदार नवनीत राणा यांना इस्टाग्रामवर जीवे मारण्याची धमकी

अमरावती: जिल्ह्याच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. “इसाभाई” नावाच्या एका व्यक्तीने इंस्टाग्रामवरून अश्लील शिवीगाळ करत थेट धमकी दिल्याची माहिती त्यांच्या खाजगी स्वीय सहाय्यक विनोद गुहे यांनी दिली आहे.
या प्रकरणी विनोद गुहे यांनी 7 ऑगस्ट रोजी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुनीत कुलट यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक तपास करण्यात आला आणि संबंधित इसाभाई नामक व्यक्तीविरोधात भारतीय दंड विधानातील कलम 296, 357(3) तसेच आयटी ॲक्ट अंतर्गत कलम 79 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या राजापेठ पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपीच्या शोधासाठी पुढील पावलं उचलली जात आहेत.