महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

प्रियकरानेच प्रेयसीच्या गळ्यावर केले वार, धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं, नेमकं प्रकरण काय?

लग्न मोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकरानेच वार केल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. या घटनेत प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे.

Nagpur Crime News : लग्न मोडणाऱ्या प्रेयसीच्या गळ्यावर प्रियकरानेच वार केल्याची धक्कादायक घटना vजिल्ह्यात घडली आहे. या घटनेत प्रेयसी गंभीर जखमी झाली आहे. तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथी गावात घडली आहे. या धक्कादायक घटनेनं नागपूर हादरलं आहे. नेमकं प्रकरण काय? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.

प्रियकराने बायकोला सोडचिठ्ठी दिली, त्यानंतर प्रेयसीनेही दिला लग्नास नकार

प्रियकराचे लग्न झाल्यानंतर प्रेयसीने प्रियकराच्या बायकोला प्रत्यक्ष भेटून लग्न करणार असल्याचे सांगितले. त्यामुळं प्रियकराने बायकोला सोडचिठ्ठी दिली. मात्र, त्यानंतर प्रेयसीने लग्नास नकार दिला. त्यामुळं चिडलेल्या प्रियकराने प्रेयसी हनुमान मंदिरात पूजा करीत असताना हनुमानाच्या मूर्ती समोरच तिच्या गळ्यावर चाकूने वार केले. ही घटना खापरखेडा पोलीस स्टेशन हद्दीतील गुमथी गावात आज घडली आहे. गंभीर जखमी झालेल्या प्रेयसीवर नागपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून खापरखेडा पोलिसानी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केल्यानंतर त्याची चौकशी सुरु करण्यात आली आहे. प्रेयसीनं लग्नाला नकार दिला हेत कारण आहे की, अन्य काही कारणास्तव प्रेयकराने हे कृत्य केलं याचा तपास पोलिस प्रशासन करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार 20 वर्षीय तरुणी आणि आरोपी प्रियकर रोशन सोनेकर (32 वर्ष) एकाच गावात राहत असून त्यांचे प्रेमसंबंध होते. दरम्यान रोशनचे एका अन्य मुलीशी लग्न झाले होते. लग्नानंतर रोशनच्या बायकोला प्रत्यक्ष भेटून मीच रोशनसोबत लग्न करणार असल्याचे तरुणीने सांगितले होते. त्यानंतर आरोपीने आपल्या बायकोशी 2023 मध्ये सोडचिठ्ठी घेतली होती. त्यानंतर मात्र तरुणीने प्रियकरासोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. याच मुद्द्यावरुन दोघांमध्ये दोन तीन वेळा भांडणे सुद्धा झाली. प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले. तेव्हा प्रियकर रोशनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एक तर बायको सोबत सोडचिठ्ठी घ्यायला भाग पाडले, नंतर लग्नास नकार दिला, शिवाय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला त्यामुळे प्रियकर रोशन हा प्रेयसी तरुणीवर चिडून होता. त्याच रागातून त्यांनी आज मंदिरात प्रेयसीच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिला गंभीर जखमी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button