महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
राहुल गांधींच्या आरोपांना शरद पवारांचा पाठींबा; “दूध का दूध, पाणी का पाणी” करण्याची मागणी, फडणवीसांच्या वक्तव्याला फेटाळले

मतदार याद्यांतील कथित गडबडीच्या आरोपांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींच्या बाजूने भूमिका घेतली आहे. पवार म्हणाले, “या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दूध का दूध आणि पाणी का पाणी झाले पाहिजे. घटनात्मक लोकशाहीबद्दल नागरिकांच्या मनात शंका निर्माण करणे योग्य नाही.”
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर दिलेल्या प्रतिक्रिया पवार यांनी फेटाळल्या. ते म्हणाले, “आम्हाला आक्षेप निवडणूक आयोगाशी आहे, मुख्यमंत्री किंवा भाजपशी नाही. त्यामुळे भाजपने यात हस्तक्षेप करण्याची गरज नाही. जर आमची माहिती चुकीची असेल तर ती देशाला सांगावी, आणि खरी असेल तर सत्य देशासमोर आणावे.”




