महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
उमरेडमध्ये व्हिडिओ गेम पार्लरच्या आडून कसीनोचा गोरखधंधा? पोलिसांवर प्रश्नचिन्ह

नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वाघ नावाच्या व्हिडिओ गेम पार्लरच्या आडून कसीनो सुरु असल्याची माहिती City News Live च्या हाती लागली आहे. टिळक शॉपिंग मॉल, मारुती मंदिर, इतवारी पेठ, उमरेड येथे असलेल्या या पार्लरचे व्हिडिओ समोर आले असून, त्यामध्ये स्पष्ट दिसते की येथे लावलेल्या मशीन या कसीनोमध्ये वापरल्या जाणाऱ्या आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षांपासून हे पार्लर याच पद्धतीने सुरु आहे आणि मोठ्या प्रमाणात लोक येथे येऊन पैशांचे जुगार खेळतात. तरीदेखील, पोलिसांच्या नजरेत हा प्रकार आतापर्यंत कसा आला नाही, यावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता उमरेड पोलिस यावर काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.