महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
मानवतेला काळिमा! पत्नीचा मृतदेह घेऊन पतीला करावी लागली दुचाकीवरून वाटचाल – नागपूर-जबलपूर महामार्गावर हृदय पिळवटून टाकणारी घटना

नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मोरफाटा येथे रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघाताने मानवतेला काळिमा फासला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत ग्यारसी यादव (३५) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या वेळी पती अमित यादव पावसात भिजत असताना मदतीसाठी वाहनचालकांना हात जोडून विनंती करत राहिला, मात्र एकाही वाहनाने मदतीचा हात पुढे केला नाही.
नाईलाजास्तव अमित यांनी पत्नीचा मृतदेह दुचाकीच्या मागे बांधून घरी निघण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, घटनेची माहिती कोराडी पोलिसांना मिळाल्यानंतर महामार्ग पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबवले. मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी मेयो रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची चौकशी देवळापार पोलीस करीत आहेत.

