महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपुरात नंदनवन पोलीस व युनिट-4 ची संयुक्त कारवाई; जबरी चोरी प्रकरणातील दोन आरोपी अटकेत

नागपूर: नंदनवन पोलीस ठाणे व युनिट-4 पथकाने संयुक्त कारवाई करत जबरी चोरीच्या प्रकरणात दोन आरोपींना अटक केली आहे. अटकेत आलेल्यांची नावे रफीक खान वहीद खान (३७) आणि शेख निसार शेख कादिर (३६) अशी असून, दोघेही मोठा ताजबाग, पो.स्टे. सक्करदरा येथील रहिवासी आहेत.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्ह्यात मोपेड (किंमत ₹५०,०००), विवो मोबाईल (₹१०,०००) आणि जबरी पद्धतीने हिसकावून घेतलेले चारचाकी वाहन (₹४,००,०००) असा एकूण ₹४,६०,००० किमतीचा मुद्देमाल वापरला किंवा चोरी केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक कोळी यांनी सांगितले की, आरोपींकडून चौकशीत महत्त्वाची माहिती मिळाली असून ती सिम्बा अॅपमध्ये नोंदवण्यात आली आहे.


