महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

मुलीला परीक्षा केंद्रावर सोडून परतणाऱ्या पित्याचा मृत्यू:कंटेनरची जोरदार धडक,डोंगरगावात हदरल

नागपूर :- जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथे बुधवारी सकाळी सुमारे १० वाजता एक भीषण अपघात घडला. रस्ता ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या अशोक लीलंड कंटेनरने (MH40 CM 9800) पादचारी भीसम दीनूराम शहू (५०, रा. गोपालनगर, कलमना) यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, मृतक शहू आपल्या मुलगी प्रियंकाला आयटीआयची परीक्षा देण्यासाठी डोंगरगाव येथे घेऊन आले होते. परीक्षाकेंद्रात मुलीला सोडल्यानंतर ते रस्ता ओलांडत असताना कंटेनरने त्यांना धडक दिली. या वेळी कंटेनरचे चाक त्यांच्या पायावरून गेले आणि डोक्याला डिव्हायडरला जबर धक्का लागल्याने गंभीर दुखापत होऊन जागीच प्राण गमा

अपघाताची माहिती मिळताच हिंगणा पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन वाहन जप्त करण्यात आले आहे. या घटनेमुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली. पोलिसांनी अपघाताचा गुन्हा नोंदवून सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या जबाबांच्या आधारे तपास सुरू केला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button