Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपुरात मुसळधार पाऊस; मीठा निम दर्गा परिसरात गाडीवर झाड कोसळले, अग्निशमन दलाची तत्पर कारवाई

नागपूर : शहरात आज सकाळपासून पावसाने जोर धरला आहे. मुसळधार पावसाच्या सरींमुळे मीठा निम दर्गा परिसरात तसेच भवन्स स्कूलजवळील एका गाडीवर मोठे झाड कोसळले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन केंद्राच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने झाड सुरक्षितपणे कापून गाडी बाहेर काढली आणि वाहतुकीसाठी मार्ग मोकळा केला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांत पाणी साचल्याने नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.


