नागपुरात कृष्ण जन्माष्टमी सोहळा : विहिंपची भव्य शोभायात्रा आकर्षणाचा केंद्रबिंदूश्रद्धा आणि संस्कृतीचा संगम:

नागपूर :- कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वानिमित्त रविवारी नागपूरात विश्व हिंदू परिषदेतर्फे (विहिंप) भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा वर्धा रोडवरील गोरक्षण धाम येथून सुरुवात होऊन शहरातील प्रमुख मार्गांवरून परत गोरक्षण धाम येथे समाप्त झाली.
या शोभायात्रेत भगवान श्रीकृष्ण-राधा, भोलेनाथ, विठ्ठल माऊली तसेच विविध संतांच्या जीवनावर आधारित आकर्षक झांकींनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक ढोल-ताशा पथक, लेझीम पथक, नृत्यगट आणि विविध कलात्मक सादरीकरणांमुळे वातावरण अधिकच भक्तिमय व दिमाखदार झाले.
शहरातील नागरिकांनी मार्गावर ठिकठिकाणी शोभायात्रेचे स्वागत केले. श्रद्धावानांनी फुलांच्या वर्षावातून, आरतीने आणि जलपानाची सोय करून यात्रेतील सहभागींचे मनोबल वाढवले.
ही शोभायात्रा केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता समाजातील एकता, संस्कृतीची जपणूक आणि श्रद्धेचा सशक्त संगम ठरली.




