Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

घरच्यांच्या उपस्थितीत दिवसाढवळ्या चोरी; लॅपटॉप-मोबाईल घेऊन चोर फरार, कॅमेऱ्यात कैद घटना

नागपूर : शहरात दिवसाढवळ्या चोरीच्या घटना वाढीस लागल्या असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. ताज्या घटनेत पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बुद्धनगर परिसरात चोरट्याने घरात घुसून लॅपटॉप व मोबाईल चोरून नेले. धक्कादायक बाब म्हणजे ही घटना घरच्यांच्या उपस्थितीत घडली.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी डॉ. श्याम शेंडे हे आपल्या कुटुंबासह बुद्धनगर येथे राहतात. बुधवारी सकाळी जोरदार पावसामुळे सर्व कुटुंबीय घराच्या वरच्या मजल्यावर होते. त्याच वेळी एक अज्ञात चोर खालच्या मजल्यावर शिरला आणि तिथे ठेवलेला लॅपटॉप व दोन मोबाईल घेऊन फरार झाला.

चोरीची संपूर्ण घटना शेजारील घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. कॅमेऱ्यात आरोपीची हालचाल स्पष्टपणे दिसत असल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच डॉ. शेंडे यांनी तात्काळ पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.

दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला असून परिसरात चोरट्यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button