तरुणी मृत्यू शय्यवर, कुटुंबाला मदतीची अपेक्षा,अजनी रेल्वे स्थानकावर 15 ऑगस्ट रोजी बेशुद्ध अवस्थेत आढळली सोनी

नागपूर : कु. सोनी चोवा दास ही कर्माटांड पो.स्ट. बनियाडी थाना, जिला गिरिडी झारखंड येथील रहिवासी असून ती 14 ऑगस्ट रोजी सिकंदराबाद येथून ट्रेन नं -12721 हैद्राबाद वरून नागपूरला येण्यासाठी बसलेली होती. अंदाजे वय तिचे 23 होते. परंतु 15 ऑगस्ट रोजी नागपुरात अजनी रेल्वे स्थानकावर ती बेशुद्ध अवस्थेत आढळली. अजनी लोहमार्ग पोलिसांनी ॲम्बुलन्स बोलावून मेडिकल ट्रॉमा येथे भरती करण्यात आले. ब्रेन हॉस्पिटलमध्ये आयसीयुसी सेकंड फ्लोअर मेडिकल ट्रॉमा येथे भरती आहे. परंतु आज पाच दिवस उलटून गेले तरी तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. 15 ऑगस्ट रोजी अजनी रेल्वे स्टेशनवर ट्रेनमधून उतरते वेळी ती पडली आणि तिच्या डोक्याला जबरदस्त मार लागला त्यामुळे सोनी दास हि बेशुद्ध झाली. असे रेल्वे पोलीस पत्रकात सांगण्यात आले आहे.
डॉक्टरांना विचारणा केली असता डॉक्टर म्हणाले की मुलीच्या मेंदू चे ऑपरेशन झाले आहे. पण तिची प्रकृती खूपच नाजूक आहे.
तिच्या नातेवाईकांनी व तिच्या आईंनी प्रशासनाला मदतीची मागणी केली आहे. व तिचा चांगल्या प्रकारे उपचार व्हावा. ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

