बौद्ध भिक्षूंच्या घरी झालेली चोरी अवघ्या 48 तासांत उकलली, दोन चोर अटक

नागपूर : वाडी पोलिसांनी अतिशय तत्परता दाखवत अवघ्या 48 तासांत बौद्ध भिक्षू भंते तन्हानकर यांच्या घरी झालेली चोरी उकलली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन चोरांना पकडले असून त्यापैकी एक अल्पवयीन आहे. आरोपींच्या नावे चोरी गेलेला मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.
शुक्रवारी धम्मकीर्ती नगर, म्हाडा कॉलनी येथे भंते तन्हानकर यांच्या निवासस्थानी चोरी झाली होती. भंते प्रार्थनेत मग्न असताना चोरांनी संधी साधून घरातील सोनेरी दागिने आणि रोकड लंपास केली. घटनेनंतर भंते यांनी वाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली.
तक्रारीनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता दोन युवक घराबाहेर जाताना दिसून आले. त्यावरून पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपी करण पाल याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने अल्पवयीन साथीदारासह चोरी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींच्या निशानदहीवरून चोरी गेलेला मुद्देमाल हस्तगत करून पुढील तपास सुरू केला आहे.




