नागपुरात दिवसढवड्या खून, नाबालिकने 16 वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने केले वार, जागीच मृत्यु”

नागपूर : उपराजधानी नागपूर पुन्हा एकदा धक्कादायक खुनाच्या घटनेने हादरली आहे. अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुलमोहर कॉलनी परिसरात शुक्रवारी दुपारी एका नाबालिक मुलाने 16 वर्षीय विद्यार्थिनीवर चाकूने सपासप वार करून तिचा जागीच खून केला. दुपारीच घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत विद्यार्थिनी अजनी येथील सेंट अँथनी स्कूलमध्ये शिक्षण घेत होती. तर आरोपी नाबालिक हा रामबाग परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हत्या करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाला. माहिती मिळताच अजनी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली असून स्थानिक नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपी नाबालिकचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळा सुटल्यानंतर विद्यार्थिनी घरी परतत असताना आरोपीने तिला फोन करून बोलावले. दोघांचे गुलमोहर कॉलनीत भेट झाल्यानंतर किरकोळ वाद झाला. वादाचे रूपांतर क्षणातच भीषण घटनेत झाले. आरोपीने खिशातून चाकू काढून मुलीवर सलग अनेक वार केले. गंभीर जखमी झाल्यामुळे ती जागीच कोसळली आणि मृत्यू झाला.



