गणेशपेठमध्ये विहिरीत आढळला मानव कंकाल; पोलिसांची तपासणी सुरू

नागपूर : शहरातील गणेशपेठ पोलिस स्टेशन हद्दीत आज सकाळी एक धक्कादायक घटना उघडकीस आली. गिरजा हॉटेलच्या बाजूला, आज्ञाराम देवी मंदिराशेजारील जुन्या विहिरीतून मानवी कंकाल मिळाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या विहिरीत कचरा, पाणी आणि झुडपे साचलेले होते. स्थानिकांना दुर्गंधी जाणवल्यानंतर विहिरीत पाहणी केली असता आत मानवी सांगाडा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
विशेष म्हणजे कंकाल असला तरी मृतकाच पोट दिसून येत आहे . त्यामुळे मृत व्यक्ती काहीच दिवसा आधी मृत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मृत्यू कसा झाला, हा अपघाती प्रकार आहे की आत्महत्या अथवा काही संशयास्पद घटना, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, या विहिरीत कचरा, पाणी आणि झुडपे साचलेले होते. स्थानिकांना दुर्गंधी जाणवल्यानंतर विहिरीत पाहणी केली असता आत मानवी सांगाडा आढळून आला. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
विशेष म्हणजे कंकालावर पॅन्ट असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे मृत व्यक्ती पुरुष असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र मृत्यू कसा झाला, हा अपघाती प्रकार आहे की आत्महत्या अथवा काही संशयास्पद घटना, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलिसांनी जागा सील करून तपास सुरू केला आहे. खोरखे मॅडम (PSI) स्वतः तपासाची जबाबदारी सांभाळत आहेत. मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पुढील तपास सुरू असून, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.



