नागपूर विमानतळावर थरार : इंडिगो विमानाला उड्डाणानंतर पंछी धडक, 272 प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला

नागपूर : नागपूरहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या विमानाला उड्डाणानंतर पंछी धडकल्याने आज सकाळी नागपूर विमानतळावर मोठी धांदल उडाली. विमानात तब्बल 272 प्रवासी प्रवास करत होते. पायलटने तात्काळ शर्थीने विमान परत नागपूर विमानतळावर उतरवले आणि मोठा अनर्थ टळला.
या विमानात माजी खासदार सुधाकर कोहळे, काँग्रेस नेते शेखर भोयर, तसेच नितीन कुंभलकर यांच्यासह अनेक मान्यवर प्रवासी प्रवास करत होते. अपघातात कुणालाही इजा झाली नाही. प्रवाशांनी दिलासा व्यक्त केला असून विमानतळावर काही वेळ गोंधळाचे वातावरण होते.
विमानाच्या इंजिनमध्ये पंछी अडकला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. घटनेनंतर विमानतळ प्राधिकरणांनी तातडीने दुरुस्ती व तांत्रिक तपासणी सुरू केली आहे. प्रवाशांना पुढील प्रवासासाठी अन्य सोय करून देण्यात येत आहे.
या थरारक घटनेनंतर नागपूर विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.




