डॉक्टरच्या घरच्या चोरीचा पर्दाफाश, घरकाम करणारी मोलकरीणच निघाली चोर

नागपूर :- डॉक्टरच्या घरी झालेल्या लाखोच्या चोरीचा ‘प्रतापनगर पोलिसानी पर्दाफाश करीत घरकाम करणाऱ्या त्यांच्या मोलकरीणला ” अटक केली आहे पोलिसांनी तिच्याकडून चोरी झालेल्या मालाहून अधिक माल जप्त केला आहे. परी श्रीकांत भुजाडे (३०) रा स्वरूप कॉलनी, स्वावलंबीनगर असे अटकेतील मोलकरीणचे नाव आहे.
गावंडे लेआऊट परिसरात राहणाऱ्या फिर्यादी डॉ. लीना राहुल नेमाडे (२७) यांच्या मुलाचा ७ जून रोजी- वाढदिवस होता. वाढदिवसासाठी त्यांनी बॅकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने काढले. दागिने वाढदिवसात घातल्यानंतर ते घरातील आलमारीत ठेवले. मात्र 14 तारखेला आलमारीत दागिने बघितले असता दागिने नसल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली त्यांना त्यांच्या घरी काम करणाऱ्या मोलकरीनवर संशय होता याची कल्पना त्यांनी पोलिसांना दिली पोलिसांनी कसून चवकशी केली असता आरोपी महिलेनी गुन्हाची कबुली दिली



