Uncategorizedमहाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्रमांक 02 ने गिट्टीखदान आणि सदर पोलीस ठाण्यातील दोन घरफोड्यांचे गुन्हे उघडकीस आणत मोठा पराक्रम साधला आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण 15 तोळे सोन्याचे दागिने, इम्पोर्टेड घड्याळ तसेच रोख रक्कम मिळून 7 लाख 4 हजार 882 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

ही कारवाई समाधान नगर, गिट्टीखदान येथे घडलेल्या घरफोडीच्या प्रकरणावरून सुरू झाली होती. फिर्यादी संध्या जितेंद्र ठाकूर (रा. समाधान नगर) यांच्या घरात 6 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.30 ते रात्री 9 वाजेच्या दरम्यान चोरी झाली होती. आरोपी मोहमद ओसामा रफिक पाटका (वय 33, रा. स्वागत नगर, गिट्टीखदान) याने घराचे आत प्रवेश करून दागिने आणि रोकड लंपास केल्याचे निष्पन्न झाले.

 

 

 

सोन्याचे मंगळसूत्र, हार, चैन, झुमके, अंगठ्या असे मिळून तब्बल 15 तोळे दागिने इम्पोर्टेड घडी रोकड रक्कम एकूण 7,04,882 रुपये किंमतीचा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला.

 

गुन्ह्याच्या तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात आला. आरोपीस ताब्यात घेऊन त्याची घरझडती घेतली असता चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

 

ही यशस्वी कारवाई गुन्हे शाखा युनिट-02 च्या पथकाने केली असून पुढील कार्यवाहीसाठी आरोपीस गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button