महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
नागपूरात शिवभोजन केंद्र चालकांचे धरणे आंदोलन; सहा महिन्यांपासून थकीत बिलामुळे संताप

नागपूर : सहा महिन्यांपासून थकीत देयक न मिळाल्यामुळे नागपूर शहर व ग्रामीण भागातील शिवभोजन केंद्र चालकांनी आज (८ सप्टेंबर) संविधान चौकात दुपारी दोन वाजता भव्य धरणे आंदोलन केले.
राज्यातील जवळपास १९ हजार शिवभोजन केंद्रांमार्फत दररोज दोन लाख गोरगरीब, मजूर, महिला, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांना जेवण मिळते. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून देयक न मिळाल्याने महिला बचत गटावर कर्जाचा डोंगर वाढला असून केंद्र चालवणे अवघड झाले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्र चालकांनी सरकारकडे थकीत रक्कम तातडीने मंजूर करण्याची मागणी केली. शासनाने आठ दिवसात बिल न दिल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.




