देहव्यवसाय अड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाची धाड,देहव्यवसायाच्या धंद्यात सहभागी तिघे आरोपी, एक अल्पवयीन मुलगी सुटली

नागपूर : मानव तस्करी व व्यावसायिक लैंगिक शोषणाला आळा घालण्यासाठी पोलिस आयुक्त नागपूर शहर यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या “ऑपरेशन शक्ती अंतर्गत” विशेष मोहिमेत मोठी कारवाई करण्यात आली.
दिनांक 09 सप्टेंबर 2025 रोजी सायं. ५.३० ते रात्री ११ वाजेदरम्यान, गुन्हे शाखा सामाजिक सुरक्षा विभागाचे पथक अधिकारी व अंमलदारांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार पोलिस ठाणे यशोधरानगर हद्दीत एम.आर. हॉटेल ओयो, हाऊस नं. ४०, वॉर्ड नं. २, भिलगाव, जयस्वाल बारी येथील पहिल्या मजल्यावर छापा टाकला.
या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची नावे अशी आहेत –
1. मनीषपाल सुरेशराज राजपूत (वय ४९ वर्षे),2. सिमाराणी मनीषपालसिंग राजपूत (वय ५० वर्षे, दोघेही रा. अॅमरेसन नगर, भिलगाव, नागपूर),3. सोनू उर्फ सय्यद अली हे आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ग्राहकांना देहव्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देत होते. यावेळी एक अल्पवयीन मुलगी देहव्यवसाय करण्यास भाग पाडण्यात आल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तत्काळ पीडित मुलीची सुटका केली.
कारवाई दरम्यान आरोपींकडून रोकड २,१०० रुपये, मोबाईल फोन, एक डि.व्ही.आर. तसेच इतर साहित्य असा एकूण अंदाजे १,५२,२८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात पोलिस ठाणे यशोधरानगर येथे भा.दं.वि. कलम ३७०(३), सहकलम ३, ४, ५, ७ अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियम व इतर कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध पुढील तपास सुरू असून जप्त मुद्देमालासह कारवाईची माहिती यशोधरानगर पोलिसांकडे सोपविण्यात आली आहे.




