महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार डॉ प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात

भंडारा :- भंडारा-गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे त्यांच्या वाहनाचा आज सकाळी नागपूर – भंडारा या राष्ट्रीय महामार्गावर अपघात झाला. या वाहनात स्वतः खासदार पडोळे हे होते. दिल्ली येथून ते नागपूर विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा पीए यश पाटील, मित्र गिरीश रहांगडाले आणि वाहन चालक राहुल गिऱ्हेपुंजे असे चौघे भंडाऱ्याकडे येत असताना त्यांच्या वाहनाला उमरेड बायपास वर एका ट्रकनं जबर धडक दिली. या वाहनाचा समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. सुदैवानं या अपघातात सर्वांना किरकोळ दुखापत झाली.




