OYO होटेलमध्ये ऑनलाइन सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त, चार आरोपींवर कारवाई

नागपूर :- एमआयडीसी पोलिसांनी OYO Urban Retreat (हिंगणा रोड, नागपूर) येथील हॉटेलवर धाड टाकून ऑनलाइन सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला. या कारवाईत पोलिसांनी एकूण ₹6,03,020 किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, प्रमुख आरोपीसह तिघांना अटक करण्यात आली आहे, तर एक आरोपी फरार आहे.
9 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6:55 ते 8:30 दरम्यान पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली. आरोपी ग्राहकांना ‘Zaroor’ या वेबसाईटद्वारे आकर्षित करून सेक्स रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले. पोलिसांना घटनास्थळावरून ‘PLAYGARD’ व ‘MANFORCE’ कंपनीचे कंडोम, ग्राहक नोंदणी पावत्या, DVR फुटेज, मोबाईल तसेच रोख रक्कम हस्तगत झाली.
तीन मोबाईल फोन CP Plus कंपनीचा DVR,हॉटेल रजिस्टर पावत्या, रोख रक्कम, आणि ग्राहकांना वापरले जाणारे साहित्य एकूण मुद्देमालाची किंमत : ₹6,03,020 हस्तगत केली आहे
जयदीप संतोष सोळंके (मुख्य आरोपी),सचिन उर्फ राजेश डोंगर ,तुषार नाईक यांना अटक केली असून रतन राजेश डोंगर हा फरार आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहे




