खापरखेडा हत्या प्रकरण: आधी अपहरण, खून नंतर झाडीत फेकला शाळकरी मुलाचा मृतदेह
वडिलांकडून वसुलीसाठी मुलाचा घेतला बळी,तीन आरोपी अटक

नागपूर :- खंडणीसाठी एका अल्पवयीन विद्यार्थ्यांचे अपहरण करून त्याचा नर्घृंण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाईं करत तिन्ही आरोपींना अटक केली आहे, मृत विद्यार्थ्यांचे नाव जीत युगराज सोनेकर (१९) असून तो इयत्ता ६ वी मध्ये शिक्षण घेत होता.
तीनही आरोपींनी १५ सप्टेंबरला भानेगाव बसस्टॉप येथून अरूण भारती याच्या एम. एच. ४०, ए-७९९७ क्रमाकांच्या कारमध्ये जितचे अपहरण करून सिल्लेवाडा परिसरात नेले. तिथे गळा दाबून हत्या केली. आरोपींनी जितचा मृतदेह चनकापूर कॉलनीमध्ये एका क्वॉर्टरमध्ये लपवून ठेवला. पोलिसांची तपास पथके वारंवार जितचा शोध घेत असल्याचे माहिती झाल्याने १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास मृतदेह चनकापूर कॉलनी शिवारात झाडी झुडुपात फेकुन दिला. मुलाची आई नीलीमा युगराज सोनेकर (वय ३५, चनकापुर कॉलनी, ता. सावनेर) यांनी त्यांचा मुलगा जित युगराज सोनेकर (वय ११) हा शाळेतून घरी परत आला नाही अशी तक्रार खापरखेडा पोलिस ठाण्यात केली होती. जित युगराज सोनेकर (वय ११) हा शंकरराव चव्हान इंग्लीश मीडीयम शाळा, प्रकाशनगर, खापरखेडा येथे सहाव्या वर्गात शिकत होता. १५ रोजी जित शाळा सुटल्यावर सायंकाळी नेहमी प्रमाणे घरी आला नाही. त्याची आई नीलीमा सोनेकर हीने शाळेत जावुन चौकशी केली तसेच आजुबाजूच्या परीसरात मुलाचा शोध घेतला असता तो आढळला नाही. अपहरण झालेल्या युगचा सीसीटीव्ही, ओळखीचे नातेवाईक, मित्र, शाळेतील शिक्षक यांचा माध्यमातून शोध घेणे सुरू होते. १७रोजी चनकापूर कॉलनी शिवारातील झुडुपात एका मुलाचा मृतदेह आढळल्याची माहिती खापरखेडा पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळ गाठुन चौकशी केली असता तो जित सोनेकर असल्याची ओळख पटली. या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी राहुल गौरीलाल पाल (वय २५), अरूण बैचु भारती (वय २५) व यश गिरीश वर्मा (वय २१) असल्याचे निष्पन्न झाले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.



