तीन नल चौकात देसी पिस्तूल व ८ जिवंत काडतुसासह दोन आरोपी अटक

नागपूर : शहरातील गुन्हेगारी कृत्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी तहसील पोलीस ठाणे व झोन-३ पोलीस उपायुक्त यांच्या पथकाने संयुक्त कारवाई करून मोठी धडक दिली आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून देसी बनावटीचे पिस्तूल, आठ जिवंत काडतुसे, दोन मॅग्झिन व मोपेड वाहन असा एकूण सुमारे १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई तीन नल चौक ते इंदोरा मैदान सिटी बस स्टॉप समोरील रस्त्यावर करण्यात आली.
या प्रकरणात तहसील पोलीस ठाण्यात अप. क्र. 704/25 नोंद करण्यात आली असून, फिर्यादी म्हणून पोलीस शिपाई कुणाल कोरचे (झोन-३ पथक, तहसील पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ईशान गोविंदचंद्र जसनानी (३६ वर्षे), रा. कमल पूल चौक, लाला आटा चक्की जवळ, जरीपटका, नागपूर,इमरान खान मोहम्मद कादिर खान (२५ वर्षे), रा. रोशन बाग, जामा मशीद मागे, गरीब नवाज चौक, खरबी, वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत नागपूर असे आरोपीचे नावे आहेत
देशी बनावटी पिस्तूल मॅग्झिनसह – किंमत अंदाजे ₹८०,०००/
एक एक्स्ट्रा मॅग्झिन – किंमत ₹५,०००/-
८ जिवंत काडतुसे (₹२,०००/- प्रती) – एकूण किंमत ₹१६,०००/-
मोपेड (होंडा एक्टिवा MH-31-ET-4015) – किंमत ₹४०,०००/-
असा एकूण मुद्देमाल – ₹१,४१,०००/- जप्त करण्यात आला आहे




