सख्या भावांनी चोरल्या 50 दुचाकी : दोन आरोपी अटक, 25 लाखांचा माल जप्त

नागपूर :- हुडकेश्वर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे दोन वाहन चोरांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून २५ लाख रुपयांची ५० वाहने जप्त केली आहेत. यात ३६ मोपेड आणि १४ दुचाकींचा समावेश आहे. आरोपींमध्ये ऋतिक शाम असोपा (१९) आणि ऋषभ शाम असोपा ( २७) यांचा समावेश असून, ते टेलिफोन एक्सचेंज चौकात राहतात. दोन्हीं सख्खे भाऊ बऱ्याच काळापासून वाहन चोरी करीत होते. प्राप्त माहितीनुसार, पेट्रोलिंग करत असताना, पोलिसांना पिपला रोडवरील आरआर बारसमोर दोन तरुण अंधारात दुचाकी विकत असल्याचे समजले होते. ही वाहने चोरीची असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी सापळा रचला. दोन्ही भाऊ अंधारात बसून वाहन विकण्याचा प्रयत्न करत होते. नागरी कपडे घातलेले पोलिस अधिकारी आले आणि त्यांनी दोन्ही भावांकडून वाहनांची चौकशी केली, काहीतरी संशय आल्याने, ऋतिक आणि ऋषभ यांनी पळुन जाण्याचा निर्णय घेतला, परंतु पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडले. .त्यांनी घटनास्थळावरून आणि दोन वाहने जप्त केली.




