महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

जीएसटी करात आजपासून बदल, कोणत्या वस्तू स्वस्त अन् कोणत्या महाग? वाचा ए टू झेड यादी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी वस्तू व सेवा करात (GST Tax) महत्त्वपूर्ण बदल करण्यात आल्याची घोषणा केली होती. त्यानुसार जीएसटी कराचे 12 आणि 28 टक्क्यांचा स्लॅब (GST Tax slab) रद्द करण्यात आला होता. त्यामुळे फक्त 5 आणि 18 टक्के हे जीएसटी स्लॅब शिल्लक राहिले होते. यामुळे आतापर्यंत 12 आणि 28 टक्के जीएसटी स्लॅबमध्ये असणाऱ्या वस्तूंवरील कर कमी झाला होता. या वस्तू 5 आणि 18 टक्क्यांच्या स्लॅबमध्ये आल्या होत्या. तर आतापर्यंत पाच टक्के जीएसटी असलेल्या अनेक वस्तू करमुक्त (GST Rate) झाल्या होत्या. या नव्या जीएसटी कराची सोमवारपासून अंमलबजावणी होणार आहे. यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तू, किराणा माल, दुग्धजन्य पदार्थ, औषधे, घरगुती उपकरणे, टीव्ही, एसी, कार, बाईक, मोबाईल अशा अनेक गोष्टींच्या किंमती कमी होणार आहेत. त्यामुळे सामान्य वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे.

कोणत्या वस्तूंवर शून्य टक्के जीएसटी लागणार?

 

1. खाद्यपदार्थ- प्रोसेस्ड UHT दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा

 

2. शैक्षणिक साहित्य- पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या

 

3. आरोग्य क्षेत्र- 33 जीवनरक्षक औषधे, वैयक्तिक आरोग्य विमा, जीवन विमा

कोणत्या वस्तूंवर 5 टक्के जीएसटी लागणार?

 

1. खाद्यपदार्थ- वनस्पती तेल, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी

 

2. शाम्पू, तेल, टुथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम

 

3. घरगुती वापराच्या वस्तू- किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री, मेणबत्ती, शिलाई मशीन, नॅपकिन,डायपर्स, हँडबॅग, फर्निचर

 

4. कृषी साहित्य- ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप

 

5. वैद्यकीय वस्तू- थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे

 

6. नक्षीकाम केलेल्या वस्तू, हाताने तयार केलेले कागद, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स

 

18% GST Products: कोणत्या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी लागणार?

1. इलेक्ट्रॉनिक वस्तू- वातानुकूलित यंत्र (एसी), वॉशिंग मशीन, एलईडी एससीडी टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर

 

2. वाहने- लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, 350 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने

 

3. ट्रॅक्टरसाठी लागणारे हायड्रोलिक इंधन, इंधन पंप

 

4. सेवा क्षेत्र- हॉटेल (दिवसाला 7500 पेक्षा कमी असणारी), चित्रपटगृह (100 रुपयांपेक्षा कमी तिकीट असणारी), ब्युटीपार्लर

 

Whats get cheaper due to GST: जीसएटीमुळे कोणत्या गोष्टी स्वस्त झाल्या?

 

1. खाद्यतेल, पीठ, तूप, साखर, पास्ता, बिस्कीट

 

2. नोटबुक, पेन्सिल, शैक्षणिक साहित्य

 

3. साबण, शाम्पू, टुथपेस्ट, किचनमधील वस्तू

 

4. औषधे आणि आरोग्य विमा

 

5. टीव्ही, एसी, कार, बाईक, ट्रॅक्टर आणि कृषी उपकरणे

 

Whats get costly due to GST: जीसएटीमुळे कोणत्या गोष्टी महाग झाल्या?

1. चैनीच्या वस्तू आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तू

 

2. 350 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकी, मोठ्या एसयुव्ही व्हेईकल, अलिशान कार, रेसिंग कार (या सगळ्यावरील कर 28 टक्क्यांवरुन 40 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.)

 

3. कॅसिनो, रेस क्लब, जुगार आणि सट्टेबाजी (या सगळ्यावरील कर 28 टक्क्यांवरुन 40 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.)

 

4. हानिकारक उत्पादने- सिगार, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, कॉर्बोनेटेड आणि कॅफिनयु्क्त पेयं (या सगळ्यावरील कर 28 टक्क्यांवरुन 40 टक्के इतका वाढवण्यात आला आहे.)

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button