धक्कादायक! सावत्र वडिलांकडून अल्पवयीन मुलीचे वारंवार शारीरिक शोषण; जीव मारण्याच्या धमकीमुळे ४ वर्षे शांत, अखेर आईसमोर उघडकीस – आरोपी अटक

नागपूर : शहराला हादरवून सोडणारी घटना पारडी पोलीस ठाणे हद्दीत उघडकीस आली आहे. सावत्र वडिलांनीच एका अल्पवयीन मुलीचे वारंवार शारीरिक शोषण केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलगी १४-१५ वर्षांची असताना हा नराधम तिच्यासोबत अमानुष कृत्य करू लागला. आज ती मुलगी १८ वर्षे ३ महिन्यांची असून इतकी वर्षे भीतीपोटी तिने हे प्रकरण लपवून ठेवले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वारंवार मुलीचे शारीरिक शोषण करत असे. विरोध केल्यास तिला मारहाण करून जीव घेण्याची धमकी देत असे. त्यामुळे घाबरून पीडित मुलगी आतापर्यंत गप्प राहिली. मात्र अखेर तिने आईसमोर आपली व्यथा सांगितली. आईने धैर्य दाखवत तात्काळ पारडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सावत्र वडिलास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. कुटुंबातील सुरक्षिततेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून समाजमनाला हादरा देणारी ही घटना ठरली आहे.




