महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

वाठोडा DB पथक ची धड़क कारवाई – अवैधरित्या डिझेल साठवणूक करणाऱ्या दोघांना अटक, १०२५ लिटर ज्वलनशील पदार्थ जप्त

नागपूर : – पोलीस स्टेशन वाठोडा यांचे तपास पथकाने मोठी कारवाई करत अवैधरित्या डिझेलची साठवणूक करणाऱ्या २ आरोपींना अटक केली. या कारवाईत एकूण १०२५ लिटर डिझेल तसेच अन्य साहित्य मिळून अंदाजे ₹१ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. २८ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा एक वाजताच्या सुमारास, डीबी पथकाला गुप्त माहिती मिळाली की पवनपुत्र नगर, प्लॉट क्र. ४६ येथील आऊट हाऊस रूममध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल साठवले गेले आहे. माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार ठिकाणी छापा टाकण्यात आला. कारवाईत सचिन संतोष बेनीबागडे (२७, रा. आराधना नगर, बेडगाव, नागपूर) आणि आशिष मनभरण यादव (२१, मुळगाव मेढे, ता. रामपूर बागेलान, जि. सतना, मध्य प्रदेश; सध्या रा. दामोदर ठवकर यांच्या घरी, वाठोडा) अशी आरोपींची नावे समोर आली.

 

पोलिसांनी घटनास्थळावरून ३४ प्लास्टिक कॅनमध्ये भरलेले एकूण १०२५ लिटर डिझेल, १ मोटर, डिझेल भरण्यासाठी वापरण्यात येणारी मोठी चाळी तसेच आरोपींच्या अंगझडतीतून रोख रक्कम जप्त केली. जप्त केलेल्या डिझेलची किंमतच जवळपास ₹९६,३५०, तर एकूण मुद्देमालाची किंमत ₹१,००,९५० इतकी आहे. ही धोकादायक साठवणूक परिसरातील नागरिकांच्या जीवितास व मालमत्तेस गंभीर धोका निर्माण करणारी असल्याने संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात गुन्हा क्र. ५२१/२५, कलम २८७ भा.दं.सं. सह कलम ३, ७ अत्यावश्यक वस्तू अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button