वाहन चोरी प्रकरण उघडकीस, १८ वर्षीय आरोपी अटकेत

नागपूर : बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या वाहन चोरीच्या गुन्ह्याचा छडा युनिट क्रमांक ०२ गुन्हे शाखेने लावला आहे. पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला अटक केली असून दोन विधी संघर्षग्रस्त बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
गुन्ह्यातून एकूण १.५० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात –
दोन एक्टिवा दुचाकी (एमपी 28 एससी 0102 व एमएच 31 आयईएक्स 1869)
दोन मोबाईल हँडसेट
यांचा समावेश आहे.
गुप्त बातमीदाराच्या माहितीनंतर पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी बजाजनगर परिसरातून वाहन चोरी केल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपी आर्यन धीरज गायकवाड (वय १८, रा. बेसा रोड, अलंकार नगर चौक) याला अटक करण्यात आली. तर दोन अल्पवयीनांना (वि.सं.ग्र. बालक) सूचना पत्र देऊन पालकांच्या ताब्यात सोपविण्यात आले.
सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासासाठी बजाजनगर पोलीस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.




