कपिलनगरमध्ये देशीकट्टा आणि जिवंत काडतुसासह आरोपी अटक

NAGPUR | देशीकट्टा आणि एका जिवंत काडतुसासह गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कपिलनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका आरोपीला अटक केली. त्याच्या ताब्यातून २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपीचा एक साथीदार फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.नदीम अंसारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
रात्रीच्या सुमारास कपिलनगर पोलिस गस्त घालत होते. त्यांना एक आरोपी देशीकट्टा घेऊन दुचाकीवर फिरत असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दुचाकी थांबवून आरोपी नदीमच्या वाहनाची झडती घेतली. झडतीत त्याच्या ताब्यातून देशी कट्ट मॅगझिनसह, एक जिवंत काडतुस, दुचाकी मोबाइल असा एकूण २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला हा देशी कट्टा आरोपी अर्जुन( मध्य प्रदेश) याच्याकडून आणल्याची माहिती त्याने दिली. पोलीस आता अर्जुनचा शोध घेत आहे.



