50 चोरीस गेलेल्या दुचाकी परत; 25 लाखांचा मुद्देमाल मालकांच्या स्वाधीन

नागपूर : शहरातील नागरिकांना दिलासा देणारी मोठी कारवाई करत नागपूर पोलिसांनी चोरीस गेलेल्या तब्बल 50 दुचाकी वाहनांचा शोध लावून ती परत मिळविण्यात यश मिळवले आहे. या वाहनांची एकूण किंमत अंदाजे 25 लाख रुपये असून आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये हा मुद्देमाल संबंधित फिर्यादींना परत करण्यात आला.
या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन मा. पोलीस आयुक्त, नागपूर शहर यांच्या हस्ते करण्यात आले. समारंभाचे आयोजन परिमंडळ 4 च्या पोलीस उपायुक्त सौ. रश्मीता राव यांनी केले होते.
परत मिळालेल्या वाहनांची विभागनिहाय संख्या :
हुडकेश्वर – 7 ,अजनी – 7, लकडगंज – 6 ,नंदनवन – 6 ,शांतीनगर – 3 ,सक्करदारा – 2 ,कोतवली – 2 ,जरीपटका – 2 ,कळमना – 2 इतर पोलीस स्टेशन – उर्वरित या वाहनांमध्ये 36 मोपेड व 14 मोटरसायकलीचा समावेश आहे. ही कारवाई हुडकेश्वर डीबी पथकाने उघडकीस आणली.या प्रसंगी परिमंडळ 4 मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक उपस्थित होते.



