दुर्गामातेवर घृणास्पद कृत्य – आरोपी फरार, पोलीस प्रशासनावर प्रश्नचिन्ह मुलाची छेडछाड, चाकूने वार करून मूर्तीचीही विटंबना

नागपूर : नवरात्रीच्या पावन दिवसात, जेथे दुर्गामातेची मोठ्या श्रद्धेने पूजा-अर्चना केली जाते, त्याच पावन काळात एका विकृत नराधमाने मातेच्या मूर्तीची विटंबना केली. एवढ्यावरच न थांबता त्याने मातेसमोर घृणास्पद कृत्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मानवता नगर, गिट्टीखदान येथे घडलेल्या या संतापजनक घटनेने संपूर्ण नागपूर हादरले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास सुरज खोब्रागडे या विकृताने दुर्गामातेसमोर अमानुष कृत्य केले. प्रथम पंडालात झोपलेल्या एका लहान मुलाला निवस्त्र करून छेडछाड केली आणि त्यानंतर थेट दुर्गामातेच्या मूर्तीवर अश्लील कृत्य करून तिची विटंबना केली. आरोपीने चाकूने मूर्तीवर वार करून वस्त्रे फाडली आणि देवीच्या पावित्र्यावर घृणास्पद आघात केला.
घटनेनंतर संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, गिट्टीखदान पोलिसांनी गंभीर हलगर्जी दाखवून आरोपीला ताब्यातून पसार होऊ दिले. या निष्काळजीपणामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून पोलिस प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या नराधमाने यापूर्वी देखील एका घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले होते, ज्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामुळे अशा विकृत प्रवृत्तीचा व्यक्ती अजूनही मोकाट फिरत असल्याने महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत गंभीर शंका निर्माण झाल्या आहेत.
धार्मिक भावना पायदळी तुडवणारा आणि मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न करणारा हा विकृत अजूनही फरार असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आरोपीला तातडीने अटक करून कठोरात कठोर



